16 December 09:00

थंडीत गाई व म्हशींची घ्यावयाची काळजी


थंडीत गाई व म्हशींची घ्यावयाची काळजी

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१६ जानेवारी २०१७ जनावरे धुताना व धार काढताना थंड पाण्याऐवजी गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करावा. सडांना चिरे पडले असतील तर त्यावर तिळाच तेल, वॅसलीन किंवा पेट्रोलीअम जेली लावावे. धार काढणाऱ्या माणसांनी स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. त्यांची नख व्यवस्थित कापलेली असावी कारण नखामुळे सडांना चिरा पडू शकतात. गाईंना घाम येतो पण म्हशींना घाम येत नाही त्यामुळे हिवाळ्यात म्हशींना तेलाची मालिश करणे फार गरजेचे आहे, यामुळे माशांपासून संरक्षण मिळते व रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. म्हशींची त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.
प्रीतम नलावडे
कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/adverties_product.php