04 December 17:44

ताराबाईंना ‘नवजीवन’; जिद्दीने उभारली द्राक्ष बाग


ताराबाईंना ‘नवजीवन’; जिद्दीने उभारली द्राक्ष बाग

कृषिकिंग, निफाड(नाशिक): ताराबाई बबन पडोळ या नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील सोनेवाडी गावातील द्राक्ष उत्पादक महिलेच्या पतीने आत्महत्या केल्याच्या दोन वर्षांनंतर ताराबाई स्वतःच्या पायावर परत उभ्या राहत, सावरल्या आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाची फक्त जबाबदारीच उचलली नाही. तर त्या बबन यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा विचार करत, जिद्दीने द्राक्ष शेती करत आहे.

ताराबाई यांना हे बळ दिले आहे. ते महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (एम.टी.टी.टी.ए.) द्वारा संचालित "नवजीवन" प्रकल्पाने. नवजीवनने माजी मंत्री विनायक पाटील यांच्याकडून ताराबाई यांना ६७ हजार रुपयांची मदत मिळवून दिली. नवजीवन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पुनर्विकासाच्या प्रयत्नांचे ताराबाई हे एक आश्चर्यकारक उदाहरण आहे. ज्याअंतर्गत त्यांना द्राक्ष शेतीसाठी त्यांची बाग विकसित करुन मदत केली गेली आहे.

नवजीवन प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी ताराबाईची भेट घेतली. तेव्हा ताराबाईनी सांगितले की, द्राक्ष झाडांना आधार देण्यासाठी एगल्स आणि तारांची मदत मिळाल्यास मी माझ्यावर उद्भवलेल्या संकटावर मात करू शकेल. आणि मग नवजीवनने या गोष्टीचा पाठपुरावा करून महाराष्ट्राचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्याकडून द्राक्ष बागेच्या एगल्स आणि तारांसाठी रुपयांची ६७ हजार रुपयांची मदत मिळवून दिली.

ताराबाई यांनी मिळालेल्या मदतीचा योग्य तो फायदा घेत आपली द्राक्ष बाग उभी केली. आणि त्यानंतर आता ताराबाई यांच्या कष्टाला फळ मिळाले असून, त्यांनी गेल्यावर्षी द्राक्षे आणि टोमॅटोपासून ४ लाख ९६ हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. “द्राक्षांव्यतिरिक्त, यावर्षी मी सोयाबीन, मका, गहू आणि कांदा लागवड केली आहे. यामुळे मला वर्षाकाठी निश्चित उत्पन्न मिळवून देण्यास मदत होणार आहे. तर पिकाची कापणी झाल्यानंतर गहू लागवडीखालील जमिनीत मी आणखी एक द्राक्ष बाग विकसित करणार आहे. " असे ताराबाई यांनी सांगितले आहे.

“आमच्याकडे एक एकर द्राक्ष बाग होती. माझ्या पतीने ती दुप्पट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही समस्या उद्भवली. यासाठी त्यांनी बँकेकडून १२ लाख रुपये कर्ज घेतले. तसेच आमच्या गावातील विविध कर्जदारांकडूनही त्यांनी ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. पण जेव्हा त्यांना जाणवले की कर्जाची परतफेड करणे आहे, तेव्हा त्यांनी आत्महत्या केली.” अशी माहिती ताराबाई यांनी भरल्या डोळ्यांनी दिली. आपल्या पतीच्या मृत्युनंतर कुटुंबावर आणि कामावर त्यांनी नियंत्रण कसे ठेवले यावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, मी सर्वप्रथम शेतातील कापणी करून गावातील कर्जदारांकडील सर्व कर्जाची परतफेड केली. त्यामुळे माझ्याबद्दल लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आणि कीटकनाशक आणि खत विक्रेत्यांनी मला कर्जाऊ स्वरुपात साधने पुरवली." आणि पतीच्या मृत्युनंतर मी आज माझ्यावर उद्भलेल्या संकटातून बऱ्याच प्रमाणात सावरत पुन्हा नव्याने उभी राहिली आहे.टॅग्स