16 January 14:49

तस्करीचा बांग्लादेशी कांदा बंगालमध्ये मिळवतोय दुप्पट दाम


तस्करीचा बांग्लादेशी कांदा बंगालमध्ये मिळवतोय दुप्पट दाम

कृषिकिंग, कोलकाता(प.बंगाल): बांग्लादेशात स्थानिक उन्हाळ प्रजातीचा हिरवा कांदा (पातीचा) तस्करीच्या मार्गाने आणून बंगालमध्ये विकला जात आहे. बांग्लादेशमधील स्थानिक बाजारपेठेपेक्षा बंगालामध्ये हा कांदा दुप्पट दाम मिळवत असल्याने तस्करी करून हा कांदा इकडे आणला जात आहे.

बांग्लादेशात हा हिरवा कांदा (पातीचा) साधारणपणे ८ ते १० रु. / किलो दर मिळवतो. मात्र, बंगालमध्ये त्याला १६ ते २५ रु. दर मिळत असल्याने सीमारेषेवरून याची तस्करी होत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत अजूनही नव्या कांद्याची आवक-मागणी इतपत नसल्याने कांद्याचे दर चढे आहेत. उन्हाळ कांद्यास बांग्लादेशात मागणी नसते, मात्र तोच कांदा दुप्पट किमतीला बंगालमध्ये विकला जातो. आयात करणारे भारतीय व्यावसाईक चोरट्या पद्धतीने आयात करून सरकारचाही महसूल बुडवत आहेत. तसेच अशा प्रकारे कांद्याची तस्करी करण्यात आल्याने होणाऱ्या तेजीचा लाभ म्हणावा तसा देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावला हवा, तो होत नाही.

ताजी आकडेवारी
१५ जानेवारी रोजी प. बंगाल मधील बाजारपेठांतील प्रति क्विंटल कांद्याचे दर असे होते, राणाघाट (४१५०-४२५०), काशीपुर (४२५०-४३५०), पुरुलिया (३५००-३८००). त्याचवेळी लासलगावमध्ये (१०००-३०००), मुंबई (२४००-३३००), नागपूर (२०००-३२००), नागपूर (१८००-२५००) असे कांद्यासाठी क्विंटलचे दर होते.टॅग्स