21 February 11:32

टोमॅटो, कांदा, बटाटा दर नियंत्रणासाठी सरकारची लवकरच योजना- कौर


टोमॅटो, कांदा, बटाटा दर नियंत्रणासाठी सरकारची लवकरच योजना- कौर

कृषिकिंग, नवी दिल्ली: “टोमॅटो, कांदा आणि बटाटा या रोजच्या वापरातील कृषी उत्पादनांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार एक स्थायी योजना तयार करण्याच्या विचारात आहे. ज्यामुळे टोमॅटो, कांदा आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला योग्य दर मिळणार असून, ग्राहकांनाही माफक दरात या रोजच्या वापरातील वस्तू उपलब्ध होऊ शकणार आहे.” असे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले आहे.

‘ऑपरेशन ग्रीन’ अर्थात ‘ऑपरेशन हिरव्या भाज्यां'च्या अंतर्गत आम्ही एक स्थायी योजना तयार करत आहोत. ज्यामुळे टोमॅटो, कांदा आणि बटाटा वर्षभर देशाच्या कोणत्याही भागात कोणत्याही अस्थिरतेशिवाय सहज उपलब्ध होऊ शकतील. तसेच शेतकऱ्यांनाही त्यांच्या कृषी मालाला योग्य दर मिळू शकणार आहे. त्याअनुषंगाने गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० कोटी रुपये ऑपरेशन ग्रीनसाठी वाटप केले आहे. असेही हरसिमरत कौर यांनी सांगितले आहे.टॅग्स