08 December 11:40

ज्यांना कांदा परवडत नाही, त्यांनी खाऊ नका- सहकारमंत्री


ज्यांना कांदा परवडत नाही, त्यांनी खाऊ नका- सहकारमंत्री

कृषिकिंग, नाशिक: “काही लोक कधीच कांदा न खाताही तंदुरुस्त राहतात. काही लोक अगदीच कमी प्रमाणात कांदा खातात मात्र त्यांनाही कांद्याचे भाव वाढल्यानंतर वाईट वाटते, ते दर वाढल्यामुळे बोंबा ठोकतात. त्यामुळे सरकारला नाईलाजास्तव कांद्याची निर्यात बंद करावी लागते किंवा कधी कधी इतर देशातून कांदा आयात करून बाजारभाव स्थिर ठेवावी लागते. अशावेळी ज्यांना दरवाढ झालेला कांदा परवडत नाही, त्यांनी तो खाऊ नये,” असे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील कृषी पणन मंडळाचे निर्यात सुविधा केंद्र व संघाचे नूतन कार्यालय आणि व्यापारी संकुलाच्या उद‌्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

“कळवणचा शेतकरी सहकारी संघ जर येणाऱ्या काळात प्रक्रिया उद्योग सुरु करून कार्यक्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार देऊ शकला तर हा संघ राज्यातील मॉडेल संघ ठरेल,” असेही देशमुख यावेळी म्हणाले आहेत.