31 May 08:30

जुलै महिन्यात सरासरीच्या १०१ टक्के पाऊस- आयएमडी


जुलै महिन्यात सरासरीच्या १०१ टक्के पाऊस- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. जुलै महिन्यात सामान्यच्या तुलनेत १०१ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपल्या दुसऱ्या मॉन्सून अंदाज जाहीर केला असून, त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

दरम्यान, केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर दक्षिण-पश्चिम मॉन्सून वेगाने पुढे सरकत असून, त्याचा पुढचा पडाव हा कर्नाटकची भूमी असणार आहे. भारतीय हवामानशास्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जुलै महिन्यात सामान्यच्या तुलनेत १०१ टक्के पाऊस होणार आहे. उत्तर भारताबरोबरच पश्चिम भारतातील राज्यांमध्ये यावर्षी सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य भारतात ९९ टक्के तर दक्षिण भारतात ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या अग्रिम अंदाजानुसार, यावर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात संपूर्ण देशभरात सामान्यच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच ऑगस्ट महिन्यात संपूर्ण देशभरात ९५ टक्के इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खरीपातील पिकांच्या लागवडीला सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत मॉन्सून जसा-जसा पुढे सरकेल. त्या प्रमाणात पेरणी वाढत जाईल. यावर्षी मॉन्सूनचा पाऊस हा चांगला होणार असल्यामुळे खरीपातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.टॅग्स