15 February 16:51

जीआर: कांद्याला ३१ जानेवारी २०१९ पर्यंतच्या विक्रीसाठी अनुदान मिळणार


जीआर: कांद्याला ३१ जानेवारी २०१९ पर्यंतच्या विक्रीसाठी अनुदान मिळणार

कृषिकिंग, पुणे: राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. कांदा अनुदानासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासंबंधीचा शासन निर्णय राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाकडून आज (शुक्रवार) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राज्य शासनाने २०० रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले आहे. कांदा अनुदानाची घोषणा करताना सरकारने प्रथमतः १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या कालावधीतील कांदा विक्रीसाठी अनुदान घोषित केले होते. मात्र, कांदा दरातील घसरण जैसे थे असल्याने जानेवारी महिन्याच्या अखेरीस कांदा अनुदानासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने पुन्हा एक महिन्याची म्हणजे ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुतदवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



टॅग्स