24 October 12:08

जलयुक्त शिवार योजनेचे काम शास्त्रशुद्ध पद्धतीने नव्हते- शरद पवार


जलयुक्त शिवार योजनेचे काम शास्त्रशुद्ध पद्धतीने नव्हते- शरद पवार

कृषिकिंग, मुंबई: "जलयुक्त शिवार योजनेचे काम शास्त्रशुद्ध पद्धतीने नव्हते, कोट्यवधी रूपये खर्च करून प्रसिद्धीच जास्त झाली." अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

'राज्यातील काही जिल्ह्यात जाऊन आलो, तिथली दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. सरकारकडून अजूनही दुष्काळसदृश्य परिस्थिती म्हणून बोललं जातंय, पण परिस्थिती त्याही पलीकडे आहे. राज्य सरकारने तातडीने मदत करायला हवी. तात्काळ दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि दुष्काळग्रस्त भागात पाणी नियोजन, जनावरांसाठी चारा याचा विचार करावा. अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली आहे.

दुष्काळाच्या अशा स्थितीत केंद्र मदत करत असते पण सध्या अशी परिस्थिती आता दिसत नाही. अशी टीकाही पवारांनी केली आहे.टॅग्स