26 December 09:00

जनावरांमध्ये होणाऱ्या लाळ्या खुरकत रोगाची लक्षणे व ईलाज


जनावरांमध्ये होणाऱ्या लाळ्या खुरकत रोगाची लक्षणे व ईलाज

स्त्रोत: कृषिकिंग मासिक जून २०१६

लाळ्या खुरकत रोगाची लक्षणे व ईलाज
लक्षणे अत्यंत सांसर्गिक व विषाणूजन्य रोग असून सर्व द्वीखुरी जनावरांना होतो. जनावरांना अचानक भरपूर ताप येतो. जीभ व हिरड्यांवर तसेच खुरांमध्ये फोड येतात. ते फोड फुटल्यानंतर विषाणू बाहेर पसरतात आणि गोठ्यामध्ये संसर्ग होतो. या जखमांमुळे जनावरे लंगडतात आणि लाळ गाळू लागतात. खाणे, पिणे तसेच फिरणे मंदावते आणि अशक्तपणा येऊन जनावरे दुध कमी देतात.

ईलाज तीन महिन्यांपुढील जनावरास दर सहा महिन्यानंतर लसीकरण करावे. गाय/ म्हशीसाठी २ मिली आणि शेळी व मेंढ्यांसाठी १ मिली. याप्रमाणे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करावे.

लेखक- डॉ. ऋषिकेश काळे, पशुधन विकास अधिकारी पुणे.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82