03 January 09:00

जनावरांमधील होणाऱ्या फऱ्या रोगाची लक्षणे व ईलाज


जनावरांमधील होणाऱ्या फऱ्या रोगाची लक्षणे व ईलाज

स्त्रोत: कृषिकिंग मासिक जून २०१६

फऱ्या रोगाची लक्षणे व ईलाज
लक्षणे जीवाणूजन्य आजार असून Clostridium chauvoei जिवाणूंमुळे होतो. विशेषतः गायवर्गामध्ये अधिक प्रमाणात आढळतो काही वेळा म्हैस व शेळ्या मेंढ्यांमध्ये होतो. विशेषतः २ वर्षांखालील तरुण जनावरांमध्ये हा रोग दिसून येतो. बाधित जनावरांना अचानक भरपूर ताप येतो. बाधित जनावर लंगडू लागते तसेच ज्या पायाने लंगडत आहे त्या पायावरील स्नायुंवर सूज येते आणि सुजेवर दाबल्यास चरचर आवाज येतो.

ईलाज तीन महिन्यांपुढील जनावरास दर वर्षी पावसाळयापूर्वी मे-जून महिन्यात लसीकरण करावे. गाय/ म्हशीसाठी ५ मिली याप्रमाणे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करावे.

- डॉ. ऋषिकेश काळे, पशुधन विकास अधिकारी पुणे.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82