30 December 09:00

जनावरांमधील होणाऱ्या घटसर्प रोगाची लक्षणे व ईलाज


जनावरांमधील होणाऱ्या घटसर्प रोगाची लक्षणे व ईलाज

स्त्रोत: कृषिकिंग मासिक जून २०१६

घटसर्प रोगाची लक्षणे व ईलाज
लक्षणे जीवाणूजन्य आजार असून Plasteurella multocide जिवाणूंमुळे होतो. विशेषतः म्हैसवर्गामध्ये अधिक प्रमाणात आढळतो काही वेळा गाय व शेळ्या मेंढ्यांमध्ये होतो. बाधित जनावरांना अचानक भरपूर ताप येतो. घसा व जिभेस सूज येते, तोंडातून भरपुर लाळ गळते, श्वासोच्छवासास त्रास होतो व घरघर आवाज येतो. न्युमोनिया होतो व तातडीने उपचार न मिळाल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते.

ईलाज तीन महिन्यांपुढील जनावरास दर वर्षी पावसाळयापूर्वी मे-जून महिन्यात लसीकरण करावे. गाय/ म्हशीसाठी ५ मिली आणि शेळी व मेंढ्यांसाठी २.५ मिली. याप्रमाणे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करावे.

- डॉ. ऋषिकेश काळे, पशुधन विकास अधिकारी पुणे.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82