01 March 09:00

जनावरांमधील ब, ड आणि ई जीवनसत्वाच्या कमतरतेची लक्षणे


जनावरांमधील ब, ड आणि ई जीवनसत्वाच्या कमतरतेची लक्षणे

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८

जीवनसत्व गटातील जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे कुपोषणासारख्या समस्या उद्भवतात. रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये कोटीपोटात ब जीवनसत्व तयार होत असल्यामुळे त्यांची कमतरता सहसा भासत नाही.
जनावरांमध्ये शक्यतो जीवनसत्वाची कमतरता भासत नाही व त्याचा फारसा परिणाम प्रजोत्पादनावरही होत नाही. काही वेळा जनावर माजावर न येणे यासारखे प्रकार आढळतात.
जीवनसत्वाचे प्रजोत्पादानामध्ये महत्व अजूनही सिद्ध झालेले नाही. परंतु ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वार अडकणे यासारखी समस्या उद्भवते. वार अडकल्याने गर्भाशयात इजा होऊन त्याचा पुढील प्रजननावर आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. मोड आलेली मटकी आणि गव्हाचे अंकुर यामध्ये ई जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. १००० आय. यु. ई जीवनसत्व जर आपण गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात जनावरास दिल्यास वार अडकणे यासारख्या समस्या टाळता येतात.

- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82