27 February 09:00

जनावरांमधील अ जीवनसत्वाच्या कमतरतेची लक्षणे


जनावरांमधील अ जीवनसत्वाच्या कमतरतेची लक्षणे

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८

अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्रजोत्पादन संस्थेतील पेशींची तसेच शेमलपटलांची वाढ नीट होत नाही तसेच जनावर आडणे, वासराचा मृत्यू होणे, कमजोर वासरांना जन्म देणे, वार/ झार अडकणे, गर्भाशयाचा दाह तसेच गर्भाचा सुरुवातीच्या स्थितीतच मृत्यू होणे यासारख्या समस्या आढळून येतात. दुधाळ जनावरांना अ जीवनसत्वाची गरज ३५००० ते ४५००० आय. यु. प्रती दिन एवढी असते. तर गाभण जनावरांमध्ये हे प्रमाण वाढते. अ जीवनसत्वाची गरज पूर्ण करण्यासाठी जनावरांच्या आहारामध्ये हिरव्या चांगल्या प्रतीच्या चाऱ्याचा उपयोग केल्यास कमतरता जाणवत नाही. याबरोबरच जनावर विण्याआधी जर आपण जीवनसत्व अ आणि डी ३ जनावरास दिल्यास सर्व समस्या टाळता येतात.

- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82