16 January 09:00

जनावरांना होणाऱ्या ब्रुसेल्लोसीस रोगाची लक्षणे व ईलाज


जनावरांना होणाऱ्या ब्रुसेल्लोसीस रोगाची लक्षणे व ईलाज

स्त्रोत: कृषिकिंग मासिक जून २०१६

ब्रुसेल्लोसीस रोगाची लक्षणे व ईलाज
लक्षणे जीवाणूजन्य प्राणीसंक्रमित रोग आहे. Brucella abortus जीवाणूमुळे होतो. बाधित जनावरांमध्ये गर्भधारणेच्या शेवटच्या काळात गर्भपात होतो. अशा परिस्थितीत वार अडकून पडणे, गर्भपिशवीत पु होणे, इ. अडचणी निर्माण होऊ शकतात. नारांमध्ये लैंगिक अवयवांवर सूज येणे, तसेच नपुंसकत्व येते.

ईलाज ४ ते ८ महिन्यांच्या मादीला (गर्भवती मादीला देऊ नये) २ मिली प्रती जनावर याप्रमाणे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्वचेखाली लसीकरण करावे. लसीकरणानंतर २१ दिवसांनी सुरु होणारी रोगप्रतिकारशक्ती जनावरांना आयुष्यभर राहते.

- डॉ. ऋषिकेश काळे, पशुधन विकास अधिकारी पुणे.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82