14 January 16:01

दुधाळ जनावरांना लसीकरण करतेवेळी घ्यावयाची काळजी


दुधाळ जनावरांना लसीकरण करतेवेळी घ्यावयाची काळजी

1) दर 3 महिन्यांनंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य जंतनाशके द्यावे. त्यामुळे लसीची ताकद व प्रभाव वाढतो.
2) आजारी तथा बाधित जनावरांचे लसीकरण करू नये.
3) लसीकरण करते वेळी पशुवैद्यकाला जनावराच्या गाभणपणाबद्दल माहिती जरूर द्यावी.
4) जनावरांचे लसीकरण शक्यतो सकाळी लवकर अथवा सायंकाळी करावे.
5) जनावरांना जंतनाशके दिल्याच्या तसेच लसीकरणाच्या नोंदी ठेवाव्यात.
6) जनावरांचे लसीकरण केल्यानंतर त्यांची सदर रोगाविरुद्धची रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होण्यास साधारणतः 21 दिवस लागतात त्यादरम्यान जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे.
डॉ. ऋषिकेश काळे, पशुधन विकास अधिकारी, पुणेटॅग्स

0