21 November 09:00

जनावरांना ऊस / ऊसाची वाढी भरपूर खाण्यास दिल्यास जास्तीचे खनिज मिश्रण देणे आवश्यक आहे.

जनावरांना ऊस / ऊसाची वाढी भरपूर खाण्यास दिल्यास जास्तीचे खनिज मिश्रण देणे आवश्यक आहे.

जनावरांना ऊस / ऊसाची वाढी भरपूर खाण्यास दिल्यास जास्तीचे खनिज मिश्रण देणे आवश्यक आहे.
असे जास्तीचे खनिज मिश्रण देणे फारच गरजेचे आहे. शेतात ऊसाचे उत्पन्न (त्याला टनेज म्हणतात) चांगले येण्यास रासायनिक खते भरपेट दिली जातात त्यांच्यात अनेक प्रकारीच अशुद्धतत्त्वे असतात. बहुतेक सर्व ऊसाच्या प्रत्येक भागात येतात. गायी/म्हशीच्या पोटात गेल्यावर ही तत्त्वे / रसायने वेगळी होऊन पोटात घेतलेल्या आहारातील कॅल्शियम, कॉपर, कोबाल्ट, मॅग्निशिअम, झिंक अशा महत्त्वाच्या खनिजांबरोबर संयुगे तयार करून हे खनिजे शरिराला मिळून देत नाहीत. ज्या गायी/म्हशींना रोज ५० ते ६० वाढे खाण्यास देतात त्यांना रोज ६० ते ७५ ग्रॅम जास्तीची खनिज मिश्रणे देणे महत्त्वाचे आहे.
लेखक- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०टॅग्स