30 January 09:00

जनावरांच्या वंश व जातीनुसार दुधातील फॅट आणि डिग्रीचे प्रमाण बदलते


जनावरांच्या वंश व जातीनुसार दुधातील फॅट आणि डिग्रीचे प्रमाण बदलते

स्त्रोत: कृषिकिंग डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८

जनावराच्या वंशानुसार त्याच्या दूधातील फॅटचे प्रमाण बदलते. उदाहरणार्थ म्हैसवंशीय जनावराच्या दूधात ६ टक्के तर गायवंशीय जनावराच्या दूधात ४ टक्के फॅटचे प्रमाण सर्वसाधारणपणे असते. एखादया वंशातील विविध जातीनुसार जनावरांच्या दुधातील फॅटचे प्रमाण बदलते. जर्सी जातीच्या गाईच्या दुधात ५.५ टक्के तर होलस्टीन फ्रिजियन जातीच्या गाईच्या दुधात ३.५ टक्के फॅटचे प्रमाण असते. सर्वसाधारणपणे जास्त दूध देणा-या जातीतील जनावरे फॅटचे प्रमाण कमी असणारे तर कमी दूध देणा-या जातीतील जनावरे फॅटचे प्रमाण जास्त असणारे दूध देतात. विशिष्ट जातीतील वेगवेगळया जनावरांच्या दूधातील फॅटचे प्रमाणही वेगवेगळे असते. जे त्यांच्या आनुवंशिकतेनुसार ठरते. अशाप्रकारे उत्तम आनुवंशिकता असणा-या जनावरांपासून त्यांचा आहार आरोग्य आणि व्यवस्थापन उत्तम राखल्यास त्यांच्यापासून जास्त फॅटचे दूध मिळविणे उत्पादकास शक्य आहे.

- डॉ. एस.आर.कोल्हे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ. जि. सातारा.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82