15 October 13:53

चुकीच्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांकडून हवामान विभागाला टाळे


चुकीच्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांकडून हवामान विभागाला टाळे

कृषिकिंग, पुणे: हवामान विभागाच्या चुकीच्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला असून, पिक विम्याचे देखील हजारो कोटी रुपये मिळत नसल्याचा आरोप करित माजलगाव (बीड) येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पुण्यातील हवामान विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकुन आज (१५ ऑक्टोबर) ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हवामान विभागाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. विमा कंपन्या शेतकऱ्यांसोबत दगाबाजी करत आहे. हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे लागेबंधे असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या चुकीच्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाडा दुष्काळाचा सामना करतो आहे. सोयाबीन, कापुस, तुर, ऊस ही सगळी पिक गेली आहेत. शेतकरी आता आत्महत्येच्या परिस्थितीत आहे. पण शेतकरी आता आत्महत्या करणार नाही, हरणार ना, तर लढणार आहे. हवामान खात्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवणार आहे. हे हवामान खाते आम्हाला नको. हे हवामान खाते बंद करा. असे उपस्थित असलेल्या आक्रमक शेतकऱ्यांनी यावेळी म्हटले आहे.टॅग्स