03 October 08:30

चीनमधील भारतीय द्राक्ष निर्यातीत वाढ


चीनमधील भारतीय द्राक्ष निर्यातीत वाढ

कृषिकिंग, नवी दिल्ली: दोन वर्षांपूर्वी भारतीय द्राक्ष निर्यातदारांनी चीनमध्ये प्रवेश मिळवला, पहिल्या वर्षी सावध पवित्रा घेत नवीन बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये द्राक्षांची निर्यात निर्यातदारांनी केली होती. अशा परिस्थितीतही २०१६-१७ च्या हंगामात द्राक्ष निर्यातीत त्यामानाने वाढ झाली आहे. भारताने चीनला जवळपास १०० कंटनेर द्राक्षांची निर्यात केली आहे. ही निर्यात भारताकडून युरोप आणि ब्रिटनच्या बाजारपेठेत पाठवल्या जाणाऱ्या निर्यातीच्या तुलनेत कमी आहे. मात्र, चीन मधील द्राक्ष निर्यातीत पहिल्या वर्षी लक्षणीय वाढ झाली आहे.

तसेच आता यावर्षी २०१७-१८ मध्ये चीनमधील द्राक्ष निर्यातीसाठी चांगल्या संभावना आहे. असे म्हणत डेक्कन प्रोड्यूसचे द्राक्ष निर्यातदार नागेश शेट्टी यांनी सांगितले आहे की, “यावर्षी चीनला अधिकाधिक द्राक्ष निर्यात करण्याचा निर्यातदारांचा प्रयत्न राहील, मात्र त्यांच्यासमोर काही आव्हानेही नक्कीच राहणार आहे”टॅग्स