19 February 09:05

चालू वर्षात पावसात निम्याहून अधिक घट: आयएमडी


चालू वर्षात पावसात निम्याहून अधिक घट: आयएमडी

कृषिकिंग, पुणे: भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात १ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत पावसात ५८ टक्क्यांहून अधिक घट दिसून आली आहे.

सामान्यपणे या कालावधीत २८.८ मिमी. एवढा पाउस देशात होतो, तो यावर्षी १२ टक्के इतकाच नोंदवला गेला आहे. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पावसाची स्थिती दयनीय आहे. यादरम्यान उत्तर पश्चिम भारतात ६४ टक्के पाउस पडला. तर मध्य भारतात ४२ टक्क्यांची घट झाली.

आयएमडी ने यापूर्वी दिलेल्या अनुमानानुसार (१४ फेब्रुवारी) चालू वर्षी पावसाची सुरवात सामान्य राहील. एप्रिल व मे महिन्यात अल निनो सदृश्य परिस्थिती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र ऑगस्ट पर्यंत पर्जन्यमानासाठी सामान्य स्थिती असल्याचे हवामान तज्ञ डॉ. प्रधान यांनी सांगितले आहे.

कृषिकिंग मार्केट रिसर्च: दक्षिण आफ्रिका करतोय दुष्काळाचा सामना
मागील वर्षभरात दक्षिण आफ्रिका दुष्काळाचा सामना करत आहे. याचा थेट परिणाम हा शेती उत्पादनावर झाला असून या वर्षी कडधान्य उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. द. आफ्रिकेत रोजगार आणि पोश्नाच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत.

पाण्याचा वापर जपून करायला हवा:
मागील वर्षी ला निनो आणि इंडियन ओशन डायपोल च्या प्रभावाने पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची परिस्थिती होती, या वर्षी नेमके चित्र अद्याप स्पष्ट नाही. या वर्षी शेततळी समाधानकारकरित्या भरलेली असली तरीही इथून पुढे उन्हाच्या झळा आणि शुष्क वातावरणामुळे उपलब्ध असणारा पाणीसाठा झपाट्याने बाष्पीभवन होऊन आटत जाईल. त्यामुळे पाण्याच्या वापराचे काटेकोर नियोजन अजून ४ महिने काळजीपूर्वक करावे लागेल, असे आवाहन कृषिकिंगद्वारे करण्यात येत आहे.टॅग्स