23 May 09:00

गाय/म्हैस व्यायल्यावर पुन्हा किती दिवसांनी फळविली पाहिजे?


गाय/म्हैस व्यायल्यावर पुन्हा किती दिवसांनी फळविली पाहिजे?

बहुतेक पशुपालक हा प्रश्न नेहमी विचारत असतात. सर्वांच्या मनाची एक समजूत घातली गेली आहे की व्यायल्यानंतर ३ महिन्यांनीच गायी / म्हशींना गाभ घालविले पाहिजे म्हणजे १२ महिन्यांनी एक वासरू ही कल्पना साकारली जाईल. ही बाब गाय / म्हशींच्या दुध देण्याच्या कॅपॅसिटीवर आधारित ठेवली पाहिजे. कारण पुढे ह्या गाभण झालेल्या गायी / म्हशी आटवताना त्रास होतो. म्हणून ज्या गायीचे पीक यील्ड (त्या त्या वेतातील एका दिवसाचे सर्वात जास्त दूध) किती आहे? ह्यावर ते अवलंबून ठेवावे म्हणजे ज्या गायी २० ते २५ किंवा त्यापुढे लिटरच्या पुढे दूध देतात त्यांना साधारपणे ४ महिन्यानी फळवावे तसेच कदाचित त्याचा हा पिरिअड उन्हाळ्याच्या महिन्यांत आला (म्हणजे एप्रिल ते जून) तर डोळे झाकून तो जूनपर्यंत लांबवावा. म्हणजे रिपीटचा प्रॉब्लेम येणार नाही.

- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०टॅग्स