05 December 10:52

गाय / म्हैस व्यायल्यानंतर चीक किती प्रमाणात काढावा?


गाय / म्हैस व्यायल्यानंतर चीक किती प्रमाणात काढावा?

स्त्रोत: कृषिकिंग डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८
गाय / म्हैस व्यायल्यानंतर चीक काढताना काळजी घेणे गरजेचे आहे. भरपूर दूध देणाऱ्या गायी / म्हशींच्या बाबतीत जास्त काळजी घ्यावी. वासराला १ ते दीड लीटर चीक पाजून वर १ ते दीड लीटर चीक चारही सडातून काढावा. नंतर परत ३ तासांनी वासराला १ लिटर चीक पाजून १ ते दीड लीटर काढावा व त्यानंतर परत ३ तासानी ह्याच पद्धतीने केल्यास गाय / म्हैस आजारी पडण्याची शक्यता नाही.
लेखक- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०