29 November 07:00

गहू सल्ला: रोग नियंत्रण


गहू सल्ला: रोग नियंत्रण

गहू पिकावर तांबेरा दिसू लागताच मॅन्कोझेब १.५ किलो ५०० लिटर पाण्यातून फवारावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी. गव्हावर करपा रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाची लक्षणे दिसू लागताच कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात.
डॉ. सुरेश दोडके, डॉ. भरत रासकर कृषि संशोधन केंद्र निफाड, नाशिकटॅग्स