15 November 08:30

खाद्य सबसिडीमध्ये ४ हजार ३९८ कोटींनी वाढ होण्याची शक्यता


खाद्य सबसिडीमध्ये ४ हजार ३९८ कोटींनी वाढ होण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: "यावर्षी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत करण्यात आलेल्या वाढीमुळे, २०१८-१९ या वर्षांमध्ये खाद्य सबसिडी ४ हजार ३९८ कोटींनी वाढणार आहे. खाद्य सबसिडीतील या वाढीमुळे एकूण सबसिडी १ लाख २६ हजार ४७० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे." अशी माहिती केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

२०१७-१८ या वर्षामध्ये १ लाख २२ हजार ०७२ कोटी रुपये खाद्य सबसिडी देण्यात आली होती. २०१८-१९ या वर्षामध्ये हीच सबसिडी आता १ लाख २६ हजार ४७० कोटी रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीपर्यंत २३.८ लाख टन गव्हाची खुल्या बाजारात विक्री करण्यात आली आहे. तर चालू रब्बी हंगामात मार्च २०१९ पर्यंत भारतीय अन्नधान्य महामंडळाने (एफसीआय) ५० लाख टन गहू खुल्या बाजारात विक्री करण्याची योजना बनवली आहे. असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.टॅग्स