25 June 08:00

खरीप कांद्यासाठी रुंद गादी वाफा पद्धतीचा अवलंब करावा


खरीप कांद्यासाठी रुंद गादी वाफा पद्धतीचा अवलंब करावा

लवकर लावलेल्या खरीप कांद्यासाठी वाफे तयार करण्यापूर्वी हेक्टरी 15 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा 7.5 टन कोंबडी खत किंवा 7.5 टन गांडुळ खत पसरून जमिनीत चांगले मिसळावे. गादीवाफे 15 सें.मी.उंच आणि 120 सें.मी. रुंद असे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये 45 सें.मी.इतके अंतर ठेवावे.यामुळे अतिरिक्त पाणी निघून जाईल व काळा करपा रोगापासून रोपांना नुकसान कमी होईल.रुंद गादी वाफा पद्धत ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता सोईची आहे.
डॉ.शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे