01 July 08:00

खरीप कांदा रोपवाटिकेत तणांचा बंदोबस्त करा


खरीप कांदा रोपवाटिकेत तणांचा बंदोबस्त करा

ज्या शेतकऱ्यांनी खरीपाच्या कांद्याच्या रोपवाटिकेकरिता पेरणी केली नसेल त्यांनी ती आणखी उशीर न करता त्वरित करावी. वाफे तयार करण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावेत. अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.गादीवाफे 10-15 सेंमी. उंच,1मी. रुंद आणि सोईनुसार लांब तयार करावेत.रोपवाटिकेतील तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथेलीन 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारावे.
डॉ.शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचानलाय, राजगुरूनगर 410505, पुणे