15 July 07:00

खरीप कांदा पुनर्लागण करा


खरीप कांदा पुनर्लागण करा

शेताची नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे तयार करण्यापूर्वी हेक्टरी 15 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा 7.5 टन कोंबडी खत किंवा 7.5 टन गांडुळ खत पसरून जमिनीत चांगले मिसळावे. गादी वाफे 15 सें.मी. उंच आणि 120 सें.मी. रुंद असे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये 45 सें.मी.इतके अंतर ठेवावे. रुंद गादी वाफा पद्धत ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता सोईची आहे.
डॉ.शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचानलाय, राजगुरूनगर 410505,पुणेटॅग्स