05 December 08:30

खरीप कांदा उत्पादनात २५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता


खरीप कांदा उत्पादनात २५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: "भारतातील कांदा उत्पादन हे प्रामुख्याने खरीप, लेट खरीप, आणि रब्बी या तीन टप्प्यात घेतले जाते. ज्यामध्ये खरीप कांदा १६ टक्के, लेट खरीप २० टक्के, आणि रब्बी कांदा उत्पादनाचा ६६ टक्के इतका समावेश असतो. यावर्षी दोन्ही खरीपाची लागवड ही २९ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या पुरवठा हा १७ टक्क्यांनी कमी झाला आहे. दोन्ही खरीपातील उत्पादन हे मागील वर्षीच्या ७५ लाख टन उत्पादनाच्या जवळपास २५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे." अशी माहिती भारतीय फळबाग संधोधन संस्थेचे संचालक पी.के.गुप्ता यांनी दिली आहे.

मागील वर्षी कांद्याचे विक्रमी उत्पादन
खरीप, लेट खरीप, आणि रब्बी या तीनही टप्प्यातील कांदा उत्पादन हे २०१४-१५ मध्ये १८९ लाख टन, २०१५-१६ मध्ये २०९ लाख टन, २०१६-१७ मध्ये २१७ लाख टन नोंदवले होते.टॅग्स