17 June 16:38

खरिपाच्या एकरी पेऱ्यात वाढ


खरिपाच्या एकरी पेऱ्यात वाढ

कृषिकिंग, नवी दिल्ली: सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०१७-१८ सालच्या खरीप हंगामात १६ जून पर्यंत एकरी पेरा हा ९२.८५ लाख हेक्टरवर झाला आहे. जो मागील वर्षी याच काळात ८७.५९ लाख हेक्टर होता.
सरकारी आकडेवारीनुसार, देशात धानाची पेरणी ९.२२ लाख हेक्टर वर झाली आहे. तसेच डाळींची २.२२ लाख हेक्टरवर, जाड तृनधान्याची ८.४४ लाख हेक्टरवर, तेलबियांची १.८८ लाख हेक्टरवर, उसाची ४७.५२ लाख हेक्टरवर, जूत आणि मेस्ताची ६.९० लाख हेक्टरवर, तर कपाशीची १६.६७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.