19 January 13:00

खत मंत्रालयाने अनुदानासाठी वित्त मंत्रालयाकडून २३ हजार कोटी मागितले


खत मंत्रालयाने अनुदानासाठी वित्त मंत्रालयाकडून २३ हजार कोटी मागितले

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीसाठी खत अनुदान देण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून २३ हजार कोटींची मागणी केली आहे.

केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की, डिसेंबर महिन्यात खत उत्पादक कंपन्यांना २३ हजार २८३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. तसेच आता नव्याने वित्त मंत्रालयाकडून २३ हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्याने पुढे बोलताना सांगितले आहे की, खत मंत्रालयाने नियमितपणे अर्थसंकल्पीय तरतुदीतून कंपन्यांना अनुदान दिले आहे. त्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात ७३ हजार ४४० कोटींची तरतूद करण्यात आली होती. दरम्यान, डिसेंबरपर्यंत खत उत्पादक कंपन्यांना ६० हजार ३८४ कोटींचे अनुदान अदा करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना युरिया वैधानिकरित्या नियंत्रित किमतीत ५ हजार ३६० रुपये प्रति टन दरात उपलब्ध आहे. (म्हणजेच एका ५० किलोच्या गोणीसाठी शेतकऱ्यांना साधारणतः अत्यल्प २६८ रुपये द्यावे लागतात.) खतांच्या निर्मितीसाठी येणारा खर्च आणि खतांची असलेली किंमत (एमआरपी) यातील फरक हा सबसिडीच्या स्वरुपात खते उत्पादक कंपन्यांना दिला जातो.टॅग्स