06 April 10:50

कोल्हापूर-सोलापुरला पावसाने झोडपले


कोल्हापूर-सोलापुरला पावसाने झोडपले

कृषिकिंग, कोल्हापूर/सोलापूर: दिवसभराच्या रखरखत्या उन्हानंतर राज्यातील विविध भागात काल संध्याकाळी ५ च्या सुमारास पावसाने विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारांसह हजेरी लावली. कोल्हापूर शहराला पावसाने विजांच्या कडकडाटासह गारांनी झोडपून काढले, तर तिकडे सोलापुरातही पावसाने हजेरी लावली. दरम्यान राज्यात तापमानाचा पारा वाढलेला असतानाच अचानक आलेल्या या पावसाने सोलापूर आणि कोल्हापूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात वाढ होऊन राज्यातील पारा चांगलाच वाढला होता. मात्र, आता अंगाची लाही लाही करणारा उष्मा कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. काल झालेल्या तासाभराच्या पावसाने दोन्ही जिल्ह्यात सर्वत्र पाणी-पाणी झाले. दरम्यान, या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील रब्बी हंगामात उशिरा पेर झालेल्या ज्वारी आणि गहू पिकाच्या काढणीत अडचण निर्माण झाली आहे.