13 April 09:41

कोल्हा म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांना राजू शेट्टींचं सणसणीत उत्तर


कोल्हा म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांना राजू शेट्टींचं सणसणीत उत्तर

कृषिकिंग, कोल्हापूर: ''मला कोल्हा म्हणणाऱ्यांना या निवडणुकीत जनताच उत्तर देईल'', असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केला आहे. राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार उमेदवार असून, बॅट हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे.

दरम्यान, गुरुवारी इस्लामपूर येथे पार पडलेल्या प्रचार सभेत सदाभाऊ खोत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या समोर शेट्टींना ''उसाला लागलेला कोल्हा'' असं म्हटलं होतं. त्यावर राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना सणसणीत उत्तर दिलं आहे.