12 September 10:25

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता


कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

कृषिकिंग, पुणे: मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून हा पट्टा कर्नाटककडून मध्य महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत (ता.१४) कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी; तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी; तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पावसाचा अंदाज आहे. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.टॅग्स