30 May 18:35

केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन, महाराष्ट्रात दुसऱ्या आठवड्यात आगमनाची शक्यता: आयएमडी


केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन, महाराष्ट्रात दुसऱ्या आठवड्यात आगमनाची शक्यता: आयएमडी

कृषिकिंग, पुणे: ढगाळ वातावरणामुळे कमी झालेले तापमान आणि वाढती आर्द्रता यामुळे काही भागात पाऊस तर काही भागात मेघगर्जने सोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे असे भारतीय हवामान खात्याच्या स्थानिक वेधशाळेने अंदाज वर्तविले होते. त्यानुसार केरळमध्ये आज मॉन्सून दाखल झाला आहे. राज्यात काल कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील तुरळक भागात पाऊस पडले आहे.केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झालेले असून सध्या पूर्वोत्तर भारतात पावसाने जोर धरला आहे. दरम्यान मोरा चक्रीवादळाचा प्रवास बांग्लादेशावरून पूर्वोत्तर राज्यांकडे झाला आहे.
डॉ. पाई, (वरिष्ठ हवामानतज्ञ, आयएमडी) यांनी आज कृषिकिंगला दिलेल्या माहितीत सांगितले की, मॉन्सूनच्या प्रगतीसाठी घटक अनुकूल असून, साधारणपणे २-३ जूनला चित्र अजून स्पष्ट होईल. आत्र एकंदरीत परिस्थिती पाहता मॉन्सून ७-१४ जूनदरम्यान महाराष्ट्रात दाखल होऊ शकेल. या दरम्यान महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पाउस होणार आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. साबळे, यांनी कृषिकिंग्शी बोलताना सांगितले की, सध्याची स्थिती मॉन्सूनसाठी अनुकूल असल्याने पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस होईल. हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढून त्याचा फायदा मॉन्सून पावसासाठी होण्याची शक्यता आहे. मॉन्सून पाऊस महाराष्ट्रातील पश्चिम भागात सुरु होईल. मुंबई ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली सातारा, पुणे, अहमदनगर, अमरावती व वर्धा या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल. प्रथम मॉन्सून पाऊस कोकण भागात स्थिरावेल. त्यानंतर महाराष्ट्राचे उर्वरित भागात दाखल होईल. यावर्षीचा पाऊस वेगळा असून तो चांगला बरसेल.

ग्राफिक्स सोर्स- युरोपियन वेदर फोरकास्ट