21 November 11:18

केंद्र सरकारची पावले कांदा निर्यातबंदीच्या दिशेने...


केंद्र सरकारची पावले कांदा निर्यातबंदीच्या दिशेने...

कृषिकिंग, नवी दिल्ली: किरकोळ बाजारातील कांद्याच्या वाढत्या दरावर आळा घालण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने आगामी आठवड्यापासून चार आठवडे कांदा निर्यातबंदी वा किमान निर्यात मूल्य एक हजार डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय निर्यातदारांपुढे ठेवला आहे. तसेच पंतप्रधानांकडेही याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला असून, याबाबत बुधवारी (२२ नोव्हें) अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने कांदा उत्पादकांची गोची होणार आहे.

बाजार समितीमध्ये कांदा अडीच हजार रुपयांच्या दरम्यान विक्री होत असताना केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने किरकोळ बाजारातील कांदा दर कमी करण्यासाठी निर्यातीवर बंदी घालण्याचा घाट घातला आहे. दिल्लीमध्ये किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी राज्यातील कांदा निर्यातदार उपस्थित होते.

यावेळी निर्यातदारांना बैठकीत सांगण्यात आले की, "तोंडावर निवडणूक असल्याने ग्राहकांच्या विरोधात कोणतीही भूमिका घेऊ इच्छित नाही. तसेच निर्यातदार हवालाच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे निर्यात झाली नाही तरी शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल. बैठकीमध्ये चार आठवड्यांसाठी निर्यातबंदी घालण्यात येणार वा किमान निर्यातमूल्य एक हजार डॉलर प्रति टन या दोन्हीपैकी एक निर्णय घेण्यात येणार आहे."टॅग्स