26 November 08:30

केंद्र सरकारकडून गैर-बासमती तांदळासाठी ५ टक्के निर्यात अनुदान जाहीर


केंद्र सरकारकडून गैर-बासमती तांदळासाठी ५ टक्के निर्यात अनुदान जाहीर

कृषिकिंग, नवी दिल्ली: २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत झालेली घट पाहता, केंद्र सरकारने निर्यातीसाठी ५ टक्के निर्यात अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्यातदारांना पुढील चार महिन्यांसाठी मार्च २०१९ पर्यंत ५ टक्के निर्यात अनुदान मिळणार आहे.

विदेश व्यापार संचनालयाकडून (डीजीएफटी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्यातदारांना २६ नोव्हेंबर २०१८ ते २५ मार्च २०१९ पर्यंत निर्यात अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे.