15 March 12:45

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांना दणका; रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त


कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांना दणका; रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त

कृषिकिंग, कोल्हापूर: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच दणका बसलाय. खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त करत असल्याची माहिती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. ससाणे यांच्यासोबत शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील संघटनेच्या अन्य प्रमुख पदाधिकार्‍यांनीही राजीनामे सादर केल्याने खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला खिंडार पडले आहे.

सदाभाऊ खोत हे चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. संघर्षातून निर्माण झालेल्या या नेतृत्त्वाकडून वर्षानुवर्षे अन्याय झालेल्या शेतमजूरांना किमान न्याय मिळेल. यासाठी आम्ही संघटनेची बांधणी केली. राज्यभरात संघटनेचे २ कोटी शेतमजूर असून एकट्या शिरोळ तालुक्यात ८४ हजार शेतमजूर आहे. मात्र, शेतमजूरांच्या मागण्यांसाठी मंत्री खोत यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी केराची टोपली दाखवली. खोत यांची कामकाज पध्दत पाहता भविष्यातही शेतमजूरांना न्याय मिळणार नाही. अशी खात्री झाल्याने ही संघटना बरखास्त केल्याचे सासणे यांनी सांगितले आहे.टॅग्स