08 June 07:30

कृषी क्षेत्राला उद्योगधंद्याशी जोडण्यासाठी कृषी प्रक्रिया धोरण आखणार – मुख्यमंत्री.


कृषी क्षेत्राला उद्योगधंद्याशी जोडण्यासाठी कृषी प्रक्रिया धोरण आखणार – मुख्यमंत्री.

कृषिकिंग, पुणे:शेतकरी संपाच्या निषेधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लहान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर आता शेती क्षेत्राला उद्योगधंद्याशी जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, शेती क्षेत्रातील गुतंवणूकीसाठी सरकारकडून कृषी प्रक्रिया धोरण तयार करण्यासाठी पावलं उचलली जात आहे. ज्यामुळे कृषी उत्पादनांना योग्य ते मूल्य प्रदान केले जाऊ शकते.

गेल्या १५-२० वर्षांपासून शेती परवडत नसल्याची तक्रार वारंवार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यावर फळप्रक्रिया आणि अन्य प्रक्रिया उद्योगांशी शेती क्षेत्राला जोडणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचा त्यांनी सांगितले आहे. सरकार त्यामुळे आधीपासूनच यासाठी धोरण तयार करण्यावर काम करत आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्यानंतर ते अन्न प्रक्रिया करून, स्वयंपूर्ण बनू शकतात. त्यांच्यासाठी एक स्थायी स्वरूपाची मॉडेल तयार करण्याची गरज आहे, अन्यथा कर्जाची परतफेड केल्याचा कोणताही फायदा होणार नाही. असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रस्तावित धोरणामुळे शेतकरी आपल्या नाशवंत उत्पादनांवर प्रक्रिया करू शकतील. जसे की मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि फळे यांवर प्रक्रिया करून उपयोगात आणले जाऊ शकतात. खाजगी गुंतवणूकीतून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी सर्वोत्तम किंमत मिळेल. भविष्यात शेतकरी कर्ज मुक्त होण्यासाठी उद्योगांशी शेतीचा संबंध जोडणे खूप महत्त्वाचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच शेतकऱ्यांना कायमस्वरूपी १२ तास वीजपुरवठा करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी सौर फीडर पुरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.