13 February 12:46

कृषी आणि शहरी पायाभूत सुविधांसाठी राज्याला अधिकाधिक आर्थिक सहाय्य मिळावे- मुख्यमंत्री


कृषी आणि शहरी पायाभूत सुविधांसाठी राज्याला अधिकाधिक आर्थिक सहाय्य मिळावे- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: महाराष्ट्राचे देशाच्या विकासात महत्त्वपुर्ण योगदान आहे. त्यामुळे केद्रांकडून कृषी आणि शहरी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी महाराष्ट्राला वित्त पुरवठयाबाबत अधिकाधिक सहाय्य मिळावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के.सिंह यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी.के.जैन, वंदना कृष्णा आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राने देशाच्या विकासात नेहमीच महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे. राज्य विकासाच्या विविध आघाड्यांवर उपक्रमशील राहिले आहे. शेती, शेतकरी आणि शहरी पायाभूत क्षेत्रातील सुधारणांसाठी राज्याला केंद्रीय वित्त आयोगाकडून अधिकाधिक आर्थिक सहाय्य मिळावे. यावेळी झालेल्या चर्चेत सिंह यांना राज्याच्या विविध नाविन्यपुर्ण योजना आणि उपक्रमांबाबतही माहिती देण्यात आली आहे.