28 September 09:53

कारखानदारांनी इथेनॉलबाबत पुढाकार घेण्याची वेळ आली आहे- पवार


कारखानदारांनी इथेनॉलबाबत पुढाकार घेण्याची वेळ आली आहे- पवार

कृषिकिंग, पुणे: "साखर कारखानदारांना इथेनॉलचे प्लँट उभे करण्याविषयी प्रोत्साहन देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. यापूर्वी इथेनॉल प्रकल्पाविषयी अनेक अडचणी होत्या. त्या केंद्र सरकारने दूर केल्या असून, आता कारखानदारांनी इथेनॉलविषयी पुढाकार घेण्याची वेळ आहे," असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

आगामी काळात इथेनॉल, वीज आणि साखर यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यास साखर कारखानदारीला चांगले दिवस येतील असेही ते यावेळी म्हणाले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने पार पडलेल्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखानदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याठिकाणी झालेल्या या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय सहकारी कारखाना संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, इस्माचे अध्यक्ष रोहित पवार उपस्थित होते.

उसावर हुमनी या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उसाची दर हेक्टरी उत्पादकता १५ ते २० हजार टनाने कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या भागात त्याचे प्रमाण लक्षणीय असून, कारखानदारांनी हुमनी निर्मूलनाचा उपक्रम हाती घेण्याची आवश्यक असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे.



टॅग्स