20 October 07:00

कापूस सल्ला: कापसावरील गुलाबी बोंडआळीचे नियंत्रण


कापूस सल्ला: कापसावरील गुलाबी बोंडआळीचे नियंत्रण

गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाकरिता आठवड्यातून एकवेळा बीटी कपाशीच्या शेतातील 12 ते 24 झाडांचे निरीक्षण करावे. या झाडावरील एकंदर पात्या, कळ्या, फुले आणि हिरवी बोंडे मोजावीत आणि यापैकी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त किती आहेत ती काळजीपूर्वक पाहून मोजावीत. गुलाबी बोंड अळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता क्विनालफॉस 25 ईसी 20 मिली किंवा थायडीकार्ब 75 डब्ल्यु पी 20 ग्रॅम किंवा फेनवलरेट 20 ईसी 6 मिली 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बीटी कपाशीवरील लाल्याचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने बोंडे परीपक्व होण्याच्या अवस्थेत 1 टक्का युरीया अधिक 1 टक्का मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करण्यात यावी.
डॉ. प्रशांत डब्ल्यु. नेमाडे आणि डॉ. टी. एच. राठोड
कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला