21 January 14:18

कांद्याला ३१ डिसेंबरपर्यंत अनुदान मिळणार; सुभाष देशमुखांची घोषणा


कांद्याला ३१ डिसेंबरपर्यंत अनुदान मिळणार; सुभाष देशमुखांची घोषणा

कृषिकिंग, मुंबई: कांदा अनुदान देण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत करण्याची घोषणा राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज (सोमवार) केली आहे.

कांदा अनुदान योजनेची घोषण करताना राज्य शासनातर्फे १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आता त्यात ३१ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान मिळणार आहे.

कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जात आहे. अनुदान अर्ज करण्यास यापूर्वी १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मागील आठवड्यात त्यास मुदतवाढ देऊन ती आता २५ जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.



टॅग्स