05 February 11:08

कांद्याला आता...३१ जानेवारी २०१९ पर्यंतच्या विक्रीसाठी अनुदान मिळणार


कांद्याला आता...३१ जानेवारी २०१९ पर्यंतच्या विक्रीसाठी अनुदान मिळणार

कृषिकिंग, मुंबई: राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. राज्य शासनाने २०० रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदानासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

राज्य सरकारने कांदा अनुदानाची घोषणा करताना १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या कालावधीतील कांदा विक्रीसाठी अनुदान घोषित केले होते. मात्र, कांदा दरातील घसरण जैसे थे असल्याने गेल्याच आठवड्यात कांदा अनुदानासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने पुन्हा एक महिन्याची म्हणजे ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुतदवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.टॅग्स