24 October 11:34

कांद्याने ओलांडला तीन हजारांचा टप्पा


कांद्याने ओलांडला तीन हजारांचा टप्पा

कृषिकिंग, लासलगाव: दिवाळीनंतर कांद्याने उसळी घेतली असून, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला ३२५१ रुपये, तर नव्याने दाखल होत असलेल्या लाल कांद्याला ३०५३ रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे. लाल कांदा दरात पंधराशे, तर उन्हाळ कांदा दरात सातशे रुपयांची प्रति क्विंटलमागे भाववाढ झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या सोमवारी उन्हाळ कांद्याला २५५१ इतका भाव मिळाला होता. त्यानंतर काल २३ ऑक्टोबरला सोमवारी उन्हाळ कांद्याला किमान १२०० रुपये, तर कमाल ३२५१ रुपये, तर सरासरी २९५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. तसेच लाल कांद्याला किमान १८०० रुपये, कमाल ३०५२ रुपये, तर सरासरी २६५० प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे.

कांद्याने दोन वर्षानंतर तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे लाल कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने, कांदा बाजारात येण्यास उशीर झाला आहे. परिणामी उन्हाळ कांदा भाव खात आहे.टॅग्स