02 January 14:19

कांद्याच्या १० व लसणाच्या ६ वाणाला भारत सरकारची मान्यता


कांद्याच्या १० व लसणाच्या ६ वाणाला भारत सरकारची मान्यता

कृषिकिंग, नाशिक: “चांगली गुणवत्ता असणारे कांदा व लसुण यांचे बीज राष्ट्रीय बागवानी प्रतिष्ठानने विकसित केले असून यात कांद्याचे सोळा तर लसणाचे सोळा वाण आहेत. यातील १० कांदा वाण व लसणाच्या ६ वाणाला भारत सरकारने मान्यता दिली आहे,” राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठानचे (एनएचआरडीएफच) संचालक डॉ पी. के. गुप्ता यांनी केले आहे.

निफाड तालुक्यातील चितेगाव येथील कांदा, लसूण आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. एचआरडीएफ अर्थात राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान या संस्थेला ४० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी द्राक्ष निर्यायदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, संजय होळकर उपस्थित होते. या शिबिराला महाराष्ट्रासह राजस्थानातून आलेल्या २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

गेल्या २२ महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात कांदा विकत आहे. आता जो भाव कांद्याला मिळतोय तो परतीच्या पावसात काही ठिकाणचा कांदा खराब झाल्याने माल शिल्लक नसल्याने भेटतो आहे. असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यावेळी म्हणाले आहे.टॅग्स