23 December 12:55

कांद्याच्या साठवणूक मर्यादेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ


कांद्याच्या साठवणूक मर्यादेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

कृषिकिंग, नवी दिल्ली: “वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या साठवणुकीवर घातलेल्या निर्बधांमध्ये तीन महिन्यांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी कांद्याची साठवणूक मर्यादा ही ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत निर्धारित करण्यात आली होती. ती आता ३१ मार्च २०१८ करण्यात आली आहे.” अशी माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ,

यापूर्वीही ऑक्टोबर महिन्यात सरकारने कांद्याच्या साठवणुकीवर घातलेल्या निर्बधांमध्ये तीन महिन्यांनी वाढ करून ती मर्यादा डिसेंबर २०१७ पर्यंत वाढवली होती. कांद्याच्या वाढत्या किमतींवर आणि साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या ३१ ऑक्टोबरच्या पहिल्या आदेशाला मुदतवाढ देऊन ती डिसेंबर २०१७ करण्यात आली होती. त्यात आता पुन्हा तीन महिन्यांनी वाढ करून ती मार्च २०१८ करण्यात आली आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, “२०१४-१५ मध्ये कांदा उत्पादन १८९ लाख टन, २०१५-१६ मध्ये २०९ लाख टन, आणि २०१६-१७ मध्ये २१७ लाख टन नोंदवले गेले होते. तर २०१७-१८ साठीची आकडेवारी मध्ये कृषी मंत्रालयाकडून उपलब्ध करण्यात आलेली नाही.”