17 October 12:29

कांद्याच्या साठवणूक मर्यादेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


कांद्याच्या साठवणूक मर्यादेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

कृषिकिंग, नवी दिल्ली: “सरकारने कांद्याच्या साठवणुकीवर घातलेल्या निर्बधांमध्ये तीन महिन्यांनी वाढ करून ती मर्यादा डिसेंबर २०१७ पर्यंत वाढवली आहे. कांद्याच्या वाढत्या किमतींवर आणि साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या ३१ ऑक्टोबरच्या पहिल्या आदेशाला मुदतवाढ देऊन ती आता डिसेंबर २०१७ करण्यात आली आहे.” असे केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले आहे.

मर्यादित स्वरुपात होत असलेल्या पुरवठ्यामुळे थोक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये कांद्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कांद्याच्या निर्धारित साठवणूक मर्यादेत डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, “राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती प्रति किलो ५० रुपयांपर्यंत पोहचल्या आहे. तर दुसऱ्या अन्य मोठ्या महानगरांमध्येही ३० ते ४० रुपये प्रति किलो दराने कांदा विकला जात आहे.”

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, “२०१६-१७ मध्ये (जुलै ते जून) कांद्याच्या उत्पादनात ५.८ टक्क्यांनी घट होऊन ते १९७.१३ लाख टन राहण्याची शक्यता आहे. जे यापूर्वीच्या मागील वर्षी २०९.३१ लाख टन इतके नोंदवले गेले होते.”टॅग्स