24 June 07:05

कांद्याच्या मागणीत घट


कांद्याच्या मागणीत घट

कृषिकिंग, लासलगाव: मध्यप्रदेश सरकारच्या शेतकऱ्यांकडून जास्त दरात कांदा खरेदी करून, तो कमी दरात विकण्याच्या योजनेमुळे महाराष्ट्रात कांद्याच्या मागणीत घट झाली आहे. या योजनेमुळे दुसऱ्या राज्यातील व्यापारी महाराष्ट्राऐवजी मध्यप्रदेशातून कांद्याची खरेदी करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी नसल्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट पहायला मिळत असून कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे.

उत्तरप्रदेश, बिहार, प.बंगाल, ओडीसा, आणि दक्षिण भारतातील राज्यांव्यतिरिक्त राजस्थान आणि पंजाब मध्येही महाराष्ट्रातून कांद्याची विक्री होते. परंतु, मध्यप्रदेश सरकारच्या कमी दरात कांदा विक्रीमुळे या सर्व राज्यांतील व्यापारी आता मध्यप्रदेशातील कांदा बाजाराकडे वळले आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठा ओस पडल्या आहे, तसेच या बाजारपेठांमध्ये कांद्यांचे दरही २०० रुपयांनी कमी झाले आहे.