24 October 18:39

कांद्याच्या दरात २०० रुपयांनी घसरण; बेळगावात शेतकऱ्यांचे गेटबंद आंदोलन


कांद्याच्या दरात २०० रुपयांनी घसरण; बेळगावात शेतकऱ्यांचे गेटबंद आंदोलन

कृषिकिंग, बेळगाव(कर्नाटक): कांद्याच्या दरात २०० रुपयांनी घसरण झाल्याने कर्नाटकातील शेतकऱ्यांनी आज (बुधवारी) बेळगाव एपीएमसीसमोर गेटबंद आंदोलन केलं आहे. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टायर पेटून दिल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

हुबळी-धारवाड, बंगळूर व महाराष्ट्रात सोलापूरमध्ये कांद्याला सरासरी २ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका मिळत आहे. बेळगावात प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपयांनी दर घसरले आहे. अन्यत्र चांगले दर मिळत असताना केवळ बेळगावात कांद्याचे दर कमी का? असा प्रश्‍न या आंदोलनकारी शेतकऱ्यांनी केला आहे.

दोन आठवड्यापुर्वी कांद्याचा दरात मोठी वाढ झाली होती. २ हजार रुपये ते २२०० रुपये प्रति क्विंटल इतका दर झाला होता. मात्र, मागील आठवड्यात पुन्हा या दरात घसरण झाली. बेळगावात कांद्याला १६०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत होता. त्यात आज पुन्हा २०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी एपीएमसीचे गेट बंद करून आंदोलन केले.टॅग्स