16 February 14:18

कांद्याच्या दरात बुधवारच्या तुलनेत २०० रुपयांनी घसरण


कांद्याच्या दरात बुधवारच्या तुलनेत २०० रुपयांनी घसरण

कृषिकिंग, लासलगांव: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू हंगामात प्रथमच उन्हाळा कांद्याचे आगमन झाले असुन, निर्यातमूल्य शून्य केल्यानंतरही येथील लिलावात बुधवारच्या तुलनेत आज (शुक्रवारी) सकाळच्या सत्रात लिलाव सुरू होताच दोनशे रूपयांची वेगाने घसरण झाली आहे. भाव पुन्हा घसरण होऊन पुर्वपदावर आले आहेत. अर्थात कमाल दर १७६१ रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या नाराजीत भर पडली आहे.

बाजार सुरु होताच बुधवारच्या तुलनेत आज (शुक्रवारी) सकाळी किमान भावात ४०० तर कमाल भावात २०० रूपये व सरासरी भावात १०० रूपये प्रतिक्विंटल घसरण झाली. बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याची आवक ६५० वाहने झाली होती व भाव किमान १०००, कमाल १९०७, तर सरासरी १७५० रूपये होते. मात्र आज (शुक्रवारी) सकाळी कांदा आवक एक हजार वाहनातून झाली असून, लाल कांद्याला किमान भाव ६०० कमाल भाव १७६१, सरासरी भाव १५५० रूपये तर उन्हाळ कांद्याला किमान ८००, कमाल १७६१, सरासरी १४५० भाव मिळाला आहे.टॅग्स